पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीकपात मागे

WhatsApp Group

पुणे : सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणेकरांना आषाढी एकादशीची खुशखबर मिळाली आहे. खडकवासला साखळी धरणामधील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे पुणेकरांना आता दररोज पाणी मिळणार आहे.

जलसाठ्यात पाणीपातळी वाढल्यामुळे पाणीकपातीचा (Pune water Crises) निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा आता सुरळित होणार आहे. सध्याच्या जलसाठ्यानुसार 26 जुलैपर्यंत पुणेकरांना दररोज पाणी मिळणार आहे. 26 जुलैनंतर पाणी वाटपाचा पुन्हा फेरआढावा घेण्यात येईल.