मुंबईकरांसाठी खुशखबर, देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचे लोकार्पण!

WhatsApp Group

मुंबई – नवी मुंबईकरांचा आता मुंबईचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना एक ते दीड तास लागतात, मात्र आता वॉटर टॅक्सीमुळे फक्त 30 मिनिटांमध्ये नवी मुंबईकरांना मुंबई गाठता येणार आहे. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा येथे वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे लोकांचा प्रवास सागरी मार्गाने सुकर होणार, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

700 किमीचा सागरी किनारा आहे. यामुळे सागरी प्रवासासाठी हा उत्तम पर्याय आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भाऊचा धक्का ते नवी मुंबई हा मार्ग खुला करण्यात आला.

या प्रवासासाठी मुंबईकरांना मासिक पास अकरा हजार रुपयांमध्ये उपलब्ध असेल. प्रत्येक तासाला वॉटर टॅक्सी धावणार असून मासिक पास असलेल्या प्रवाशांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही मार्गावर प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. असे असले, तरी कमाल २०० मासिक उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामध्ये पहिले येणाऱ्यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, आता अलिबाग आणि रेवस येथे चालवण्यात येणाऱ्या १४ आसनी वॉटर टॅक्सीसाठी प्रवाशांना १ हजार २०० रुपये आकारले जाणार आहेत. दरम्यान, या हायस्पीड वॉटर टॅक्सीमुळे मोठ्या मुंबईकरांच्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.