
मुंबई – MPSC परीक्षा देणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे. मात्र प्रत्येकजण MPSC परीक्षा पास होईलच असं नाही. तरीही अनेकजण अनेकदा परीक्षा देत असतात आणि उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच काही उमेदवारांसाठी MPSC ने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC latest news) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने आहे. आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/C7I315Xzbo
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 15, 2022
MPSC परीक्षेसाठी आतापर्यंत किती वेळा परीक्षा देता येणार याबद्दल अट ठेवण्यात आली होती. उमेदवारांनी कमाल मर्यादेत परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना पुन्हा परीक्षा देता येत नव्हती, मात्र MPSC तर्फे आता यात बदल करण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.