रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींसाठी, बँक 3.5 टक्के ते 7.00 टक्के व्याज दर देत आहे. IDFC फर्स्ट बँक सध्या 18 महिने 1 दिवस ते 3 वर्षे (549 दिवस ते 3 वर्षे) मुदतीच्या ठेवींवर जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याजदर देत आहे. बँकेचे नवीन दर 1 मार्च 2023 पासून लागू होणार आहेत.
IDFC फर्स्ट बँक एफडी दर
बँक आता 7 ते 29 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.50 टक्के व्याजदर आणि 30 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 4.00 टक्के व्याजदर देत आहे. बँक आता 46-90 दिवसांच्या ठेवींवर 4.50 टक्के आणि 91-180 दिवसांच्या ठेवींवर 5.00 टक्के व्याजदर देत आहे. 181 दिवस ते 366 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर आता 6.75 टक्के व्याजदर मिळेल आणि 367 दिवस ते 18 महिन्यांत (367 दिवस ते 548 दिवस) परिपक्व होणाऱ्या FD वर आता 7.25 टक्के व्याजदर मिळेल.
888 दिवसांच्या एफडीवर 8.20% व्याज
Equitas Small Finance Bank चे नवीन FD दर 1 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेने सांगितले की त्यांचे ग्राहक 888 दिवसांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 8.20 टक्के व्याज मिळवू शकतील. 12 महिने ते 24 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या गुंतवणुकीवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की सर्व प्रकारच्या खात्यांमध्ये व्याज भरणे तिमाही चालू राहील. घरगुती ज्येष्ठ नागरिकांना FD आणि RD दरांवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.