पणजीतून उत्पल पर्रिकरांना तिकिट मिळाले की नाही? पाहा भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी

WhatsApp Group

पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळीतून निवडणूक लढवणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला निवडणूक होणार असून 10 मार्चला मतमोजणी करण्यात येणार आहे.


उत्पल पर्रिकर यांना पणजीतून तिकीट नाकारले

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपने पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे. तेथून विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांनाच तिकीट देण्यात आले आहे.

भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोहर पर्रिकर यांचे कुटुंब हे आमचे कुटुंब असून उत्पलला दुसऱ्या जागेवर उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही उत्पल पर्रिकर यांना पणजी वगळता दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यांनी त्यातली एक जागा नाकारली होती. दुसऱ्या जागेची चर्चा सुरू असून उत्पल त्या मतदार संघातून उभा राहण्यास तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे.