कोकणी ही गोव्याची राज्यभाषा आहे, मराठीची बोलीभाषा नाही – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

WhatsApp Group

गोवा, कर्नाटक, केरळ याठीकाणची कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नाही तर ती एक स्वतंत्र भाषा आहे. कोंकणी भाषेला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. कारण कोंकणी ही गोव्याची राजभाषा आहे. असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत. अखिल भारतीय कोंकणी परिषदेमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे वक्तव्य केले आहे.

इतर भाषांप्रमाणे कोकणीला ही आपलं स्वतंत्र अस्तित्व असून ती गोव्याची राजभाषा आहे. आम्हाला आमच्या कोकणीचा अभिमान आहे. महाराष्ट्रातील रायगडपासून ते केरळपर्यंत विविध अंगाने कोकणी भाषा बोलली जाते.गोव्यासाठी कोकणी आमचा अभिमान स्वाभिमान सर्वकाही आहे, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

नुकतंच गुगलने भाषांतरासाठी कोकणी भाषेला स्थान उपलब्ध करून दिलं आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्यासाठी ही गौरवाची बाब असून आपण नेहमीच ऋणी असल्याचा त्यांनी सांगितले.