ग्लेन मॅक्सवेलचा धमाका, ६४ चेंडूत ठोकल्या नाबाद १५४ धावा

WhatsApp Group

बीग बॅश लीगमध्ये आज खेळल्या गेलेल्या सामन्यात मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने Glenn Maxwell वादळी खेळी केली. मॅक्सवेलने Hobart Hurricanes विरुद्ध खेळताना ६४ चेंडूत नाबाद १५४ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीत २२ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांचा समानवेश होता.

मॅक्सवेलच्या या वादळी खेळीत २२ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांचा समानवेश होता. त्याच्या या दीडशतकी खेळीने बीग बॅश लीगमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मॅक्सवेलची ही १५४ धावांची खेळी बिग बॅश लीगच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम त्याचाच संघसहकारी मार्कस स्टॉईनिसनंच्या नावावर होता. स्टॉईनिसने BBL ९ मध्ये १४७ धावांची खेळी केली होती.