अजब प्रकरण! पोटातून काढला काचेचा ग्लास

WhatsApp Group

पटणा – डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशदरम्यान एका 55 वर्षाच्या व्यक्तीच्या पोटामधून काचेचा ग्लास बाहेर काढला आहे Doctors Removed Glass from Stomach. बिहारमधे Bihar ही घटना घडली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण बद्धकोष्ठता आणि तीव्र पोटदुखीची तक्रार घेऊन मुझफ्फरपूरच्या मादीपूर भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये आला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्या रुग्णाच्या पोटातून काचेचा ग्लास बाहेर काढला.

वैशाली जिल्ह्यामधील महुआ येथील रहिवासी असलेल्या रूग्णावर शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. महमुदुल हसन यांनी सांगितले की, रूग्णाच्या अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे अहवालामध्ये त्याच्या आतड्यांमध्ये काहीतर गंभीर गडबड असल्याचे दिसून आले.

ऑपरेशनचे आणि एक्स-रेचे व्हिडिओ फुटेज पाहून डॉक्टर म्हणाले, ‘काचेचा ग्लास रुग्णाच्या शरीरामध्ये कसा पोहोचला, हे अजूनही गूढच आहे.’ ते म्हणाले, ‘आम्ही विचारले असता, रुग्णाने चहा पिताना ग्लास गिळल्याचे सांगितले. पण त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मानवी अन्ननलिकामध्ये अशा वस्तू आत जाण्यासाठी खूप अरुंद आहे.

डॉक्टर हसन यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला एन्डोस्कोपिक प्रक्रियेच्या साहाय्याने काच गुदाशयामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या आतड्याच्या आतून हा ग्लास बाहेर काढावा लागला.