
महिलांना अनेकदा समाजकंटकांकडून विनय भंगाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा त्यांना वाईट अभद्र असे शब्दही ऐकावे लागतात. यामध्ये अश्लील टिपण्या तसेच अश्लील हावभावांचाही समावेश असतो. पोलिस अशा लोकांवर कारवाईदेखील करतात, मात्र असे असूनही काही लोकांमध्ये सुधारणा दिसून येत नाही. नॅशनल क्राइम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात NCIB ने ट्विटरवर याबाबत नवीन माहिती दिलेली आहे.
‘जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेला छम्मक-चल्लो, आयटम, डायन, चारित्र्यहीन अशा अभद्र शब्दांनी संबोधले किंवा अश्लील हावभाव केले, ज्यामुळे तिच्या महिलेचा अनादर होईल, तर अशा तरुणांना कठाेर शिक्षा हाेणार आहे. भारतीय दंड अधिनीयमाच्या 509 अंतर्गत, 3 वर्षांपर्यंत कारावास/दंड किंवा दोन्ही होऊ शकताे.