
हापूर येथे किरकोळ वादातून विद्यार्थिनींमध्ये महाविद्यालयाबाहेर हाणामारी झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण पिलखुवा येथील आरएसएस पदवी महाविद्यालयाबाहेरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे, याची पुष्टी झालेली नाही. दोन्ही विद्यार्थिनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॉलेजचे गेट आणि आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसत आहे. दोन विद्यार्थिनींमध्ये कशावरून हाणामारी झाली, याला दुजोरा मिळालेला नाही. हाणामारी पाहून विद्यार्थ्यांची गर्दी जमली.
घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिस चौकी आहे. असे असतानाही पोलिसांना या प्रकरणाचा काहीच पत्ता लागला नाही. कोतवाल मुनीश प्रताप सिंह यांनी सांगितले की, महाविद्यालयाने आणि एकाही विद्यार्थिनीने चौकी आणि पोलीस ठाण्यात याप्रकरणी कोणतीही तक्रार दिलेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.
#हापुड़ में मामूली विवाद को लेकर कॉलेज के बाहर छात्राओं के बीच मारपीट, वीडियो वायरल
पिलखुवा के RSS डिग्री कॉलेज के बाहर का है मामला
#Hapur @hapurpolice @DmHapur @Uppolice pic.twitter.com/1VPbj07rZs— Shubham Rai (@shubhamrai80) December 23, 2022