आंबोलीतील हॉटेलमध्ये नाचवल्या मुली, पोलिसांच्या धाडीत धक्कादायक प्रकार उघडकीस
सिंधुदुर्ग – थंड हवामानासाठी पूर्ण देशात प्रसिद्ध असेलल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या जवळ असलेल्या ‘डार्क फॉरेस्ट रिट्रीट’ या हॉटेलवर सावंतवाडी पोलिसांनी धाड टाकत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.
या धाडीत आंबोलीतील एका हॉटेलमध्ये कर्नाटक राज्यातील एका मोठ्या कंपनीच्या पार्टीत चक्क मुली डान्स करताना आढळून आल्या. सोमवारी रात्रीच्या दरम्यान पोलिसांनी ही धाड टाकली. यावेळी तपासदरम्यान मोठ्या प्रमाणात दारुसाठाही सापडला आहे. पोलिसांनी सोमवारी उशिरा रात्री ही कारवाई केली. या पार्टीत कर्नाटकातील एका कंपनीच्या जवळपास 30 अधिकाऱ्यांचा समावेश होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुसंस्कृत आणि शांत शहर अशी ओळख असलेल्या सावंतवाडीत हल्लीच दोन महिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती, त्याचा उलघडा सावंतवाडी पोलिसांकडून यशस्वीपणे लावण्यात आला. त्यातचं आता सावंतवाडी पोलिसांनी आंबोली जवळ असलेल्या ‘डार्क फॉरेस्ट रिट्रीट’ या हॉटेलवर धाड टाकून ही दारू पार्टी रोखली. मात्र ही कारवाई स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत करण्यात आली आहे. सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक काटेकर यांनी ही संपूर्ण कारवाई आंबोलीच्या मार्गाने न जाता दुसऱ्याच मार्गाने जातं केली.
सावंतवाडीतील आंबोली जवळ असलेल्या ‘डार्क फॉरेस्ट रिट्रीट’ या हॉटेलवर धाड टाकत ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच हॉटेल मालकांसाह वेटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडीतील ही अश्या प्रकारची पहिलीच कारवाई असल्याचा दावा सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी केला आहे.