
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या 3 बायकांच्या मदतीने आपल्या मैत्रिणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह गढी नदीत फेकून दिला. मात्र या प्रकरणाची उकल क्राइम ब्रँच युनिट-2 च्या पथकाने महिलेच्या ब्रँडेड चपलाच्या मदतीने केली आहे. पोलिसांनी महिलेच्या जिम ट्रेनर प्रियकरालाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला आधीच तीन बायका आहेत. या हत्येत त्याच्या मित्राने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
TOI नुसार, पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 14 डिसेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उर्वशी वैष्णव (27) असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वशीचा आधी गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर तिचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. पोलिसांनी पुढे सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज नसतानाही गुन्हे शाखेला तिच्या चपलाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात यश आले.
गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, आम्ही मुख्य आरोपी रियाझ खान (36) आणि त्याचा सहकारी इम्रान शेख (26) याला अटक केली आहे. रियाझ हा देवनारमधील जिममध्ये ट्रेनर आहे आणि इम्रान कुरिअर डिलिव्हरीचं काम करतो. पाटील यांनी पुढे सांगितले की, मृतदेहाजवळ ब्रँडेड चप्पल आढळून आली असून, त्यांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला.