छत्तीसगडमधील मिनी नायगरा फॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रकोट धबधब्याजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने या धबधब्यामध्ये उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 110 फूट उंच पाण्यातून उडी मारताना मुलीला पाहून लोकांनी आरडाओरडा केला. मुलीला तिच्या घरच्यांनी काही कारणावरून फटकारले होते, अशी माहिती मिळाली. यानंतर ती आत्महत्या करण्यासाठी तेथे पोहोचली होती. यादरम्यान लोकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पोलिसांनी सांगितले की, लोहंडीगुडा येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाइकांनी काही कारणावरून फटकारले होते. यानंतर रागाच्या भरात मुलगी चित्रकोट धबधब्याजवळ पोहोचली. कितीतरी वेळ ती धबधब्याच्या माथ्यावर उभी होती. मुलीला असे करताना पाहून तेथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा केला. त्यांनी आवाज करून मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिने उडी घेतली.
90 फीट ऊँचे चित्रकोट वॉटरफॉल पर कुछ देर खड़े रहने के बाद एक युवती आत्महत्या के इरादे से छलांग लगा देती है,आसपास देख रहे लोग चीखना-चिल्लाना शुरू करते हैं, इसी बीच युवती तैरते हुए बाहर आ जाती है, ये जितना बड़ा कमाल है, सुरक्षा व्यवस्था पर उतना ही बड़ा सवाल भी. #Chattisgarh#bastar pic.twitter.com/h3ysMG1fbg
— Rajni Thakur (@RajniThakurCG) July 18, 2023
मुलीला इतक्या उंचीवरून उडी मारताना पाहून लोकांनी आरडाओरडा केला. घटनास्थळी तैनात असलेल्या जवानांनीही धबधब्याच्या दिशेने धाव घेत तिला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. उडी मारल्यानंतर आपण चूक केल्याचं मुलीच्या लक्षात आलं. तिने स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड केली. मुलगी नंतर पोहत किनाऱ्यावर आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.