![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
पेण येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे साप चावल्यामुळे एका चिमुरडीचा मृत्यू झाला. सारा ठाकूर असे या बारा वर्षांच्या मुलीचे नाव आहे. तिला एका विषारी मन्यार जातीच्या सापाने चावा घेतला होता. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
साराच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. साराच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.