डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या

WhatsApp Group

छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोकेदुखीच्या असह्य त्रासामुळे एका तरुणीने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही दुर्दैवी घटना शहरातील हर्सूल सावंगी परिसरात मंगळवारी दुपारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात  हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रिया रमेश बुजडे असे या मुलीचे नाव आहे. ती शहरातील एका कॉलेजमध्ये फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत होती.