
काँग्रेसचे (Congress) बडे नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा (resignation) दिला आहे. गेल्या आठवड्यातचं गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ आता गुलाम नबी आझाद यांचा सर्व पदाचा राजीनाम हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कांग्रेस नेता गुलाम नबी आजाद ने कांग्रेस पार्टी की प्राथमिक सदस्यता समेत सभी पदों से इस्तीफा दिया। pic.twitter.com/eW1UnKnRz7
— ANI_HindiNews (@AHindinews) August 26, 2022
गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या करताना त्यांचा सल्ला घेण्यात येत असे तसंच ते पक्षात सक्रिय होते. काही दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी केलेल्या आंदोलनात आझाद सहभाही होते. शिवाय त्यांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केलं होतं.