पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

WhatsApp Group

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळण्यात आलेल्या ३ कसोटी सामन्याच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने धमाकेदार कामगिरी करत २-१ ने मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच क्रीडा समीक्षक भारतीय संघच ही मालिका जिंकेल अशी भाकीतं केली होती. मात्र भारतीय संघाच्या तुलनेत कमकूवत समलज्या जाणाऱ्या दक्षिण अफ्रिका संघाने शानदार कामगिरी करत भारताचा २-१ ने धक्कादायक पराभव केला. या मालिकेतील पहिसा सामना भारताने दुसरा आणि तिसरा सामना अफ्रिकेने आपल्या नावावर केला.

पुजारा आणि रहाणे यांना आता निवृत्त करा, लोकांची सोशल मीडियावर मागणी

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या या कसोटी मालिकेत पुन्हा एकदा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सपशेल अपयशी ठरले. संघातील जेष्ठ खेळाडू असेलेल्या या दोन्ही दिग्गजांना आपल्या नावाला साजेशी खेळी करता आली नसल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत. तसेच पुजारा आणि रहाणेला संघातून काढून टाका अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांकडून शेअर करण्यात आल्या आहेत.


भारतीय संघाच्या या दोन्ही खेळाडूंना निवृत्त करा आणि श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावी अशी मागणिही यावेळी चाहत्यांनी केली आहे. तर ट्वीटरवर ‘पुराने’ हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.


पूर्ण मालिकेत पुजारा आणि रहाणे ठरले फ्लॉप

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराने ३ सामन्यात ६ डावांमध्ये १२४ धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणेने ३ सामन्यात ६ डावांमध्ये १३६ धावा केल्या आहेत

भारताचे दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले

या पराभवासह भारताचे दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. भारताला आजवर एकदाही दक्षिण अफ्रिकेच्या मैदानावर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आली नाही.