Maharashtra Election: राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित!

WhatsApp Group

राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.  निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परित्रक काढण्यात आले आहे.