Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. दरम्यान गौतमी पाटीलच्या नाशिक येथील कार्यक्रमात तुफान राडा पहायला मिळाला.
नाशिक येथील गौतमीच्या कार्यक्रमाचे महागडे तिकीट परवडत नसल्याने तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी लोक फिरकलीच नाही. दरम्यान या कार्यक्रमात पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांकडून मारहाण करण्यात आली.
कोण आहे गौतमी पाटील?
गौतमी पाटील लावणी नृत्य ही मूळची कोल्हापूरची आहे. सध्या तिची लावणी नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. पण आता ती तिच्या लावणी डान्समुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
एका शोमध्ये त्याने आक्षेपार्ह लावणी डान्स केला होता. या डान्सनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती वादातही आली होती. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी तिला तिच्या अश्लील डान्ससाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली. तसेच अनेक मराठी युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, तिच्या (गौतमी पाटील) लावणी नृत्याला महाराष्ट्रात विरोध झाला आहे, पण तरीही तिची क्रेझ कायम आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या लावणी नृत्याचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे.
गौतमी पाटीलचे काही व्हिडिओ
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram