
Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. मात्र तिच्या एका कार्यक्रमादरम्यान एवढी गर्दी झाली, की चाहते नियंत्रणाबाहेर गेले आणि त्यांनी राडा केला.
बीडमध्ये गौतमीचा डान्सचा कार्यक्रम होता. यावेळी गौतमीचे चाहते इतके अनियंत्रित झाले की शेकडो लोक थेट गौतमी नाचत असलेल्या स्टेजवरच चढले. एवढंच नव्हे, तर या वेळी स्टेजवर दगडफेकही करण्यात आली. यामुळे आता गौतमी पाटील पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा.. pic.twitter.com/nLzAtzILML
— Inside Marathi (@InsideMarathi) December 16, 2022