Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा मोठा राडा

0
WhatsApp Group

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. दरम्यान गौतमी पाटीलच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे कार्यक्रमात मोठा राडा झाला.

येथे गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. गौतमी येण्याआधीच धर्माबादच्या मोंढा मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री नऊच्या दरम्यान गौतमी पाटील येथे पोहोचली. पण गौतमी पाटील येताच तिच्या चाहत्यांनी मोठा गोंधळ झाला. स्टेज जवळ देखील गर्दी वाढत होती. मैदानात खुर्च्यांची मोडतोड आणि धावपळ सुरू झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील लावणी नृत्य ही मूळची कोल्हापूरची आहे. सध्या तिची लावणी नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. पण आता ती तिच्या लावणी डान्समुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

एका शोमध्ये त्याने आक्षेपार्ह लावणी डान्स केला होता. या डान्सनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती वादातही आली होती. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी तिला तिच्या अश्लील डान्ससाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली. तसेच अनेक मराठी युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, तिच्या (गौतमी पाटील) लावणी नृत्याला महाराष्ट्रात विरोध झाला आहे, पण तरीही तिची क्रेझ कायम आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या लावणी नृत्याचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे.