Team India Coach: गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक
Gautam Gambhir Appointed new head coach : अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. गंभीर राहुल द्रविडची जागा घेणार आहे. ज्यांचा कार्यकाळ T-20 विश्वचषकानंतर संपला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला असून नवीन भूमिकेसाठी गौतम गंभीरचे अभिनंदन केले आहे.
Former Cricketer Gautam Gambhir appointed as the new Head Coach of the Indian Cricket Team. pic.twitter.com/90QHCyD1lc
— ANI (@ANI) July 9, 2024
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर लिहिले – “भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे मी आनंदाने स्वागत करतो. आधुनिक काळात क्रिकेटचा विकास झपाट्याने झाला आहे. गौतम गंभीरने हे बदलते दृश्य जवळून पाहिले आहे.”
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
“मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. टीम इंडियासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवाची सर्वाधिक मागणी होती. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्तम न्याय देईल. बीसीसीआय त्या या नवीन प्रवासाला सुरुवात करताना त्याला पूर्ण पाठिंबा देत.” असं जय शाह म्हणाले.
द्रविडचा कार्यकाळ संपल्याच्या बातम्यांसोबतच गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या आधीच आल्या होत्या. आता जय शहा यांनी याला मान्यता दिली आहे. सध्या भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर भारत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
IPL 2024 पूर्वीच गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मार्गदर्शक बनला होता. यानंतर त्याने आपल्या मार्गदर्शनाखाली केकेआर संघाला चॅम्पियन बनवले. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर हा एकमेव उमेदवार होता. प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
India is my identity and serving my country has been the greatest privilege of my life. I’m honoured to be back, albeit wearing a different hat. But my goal is the same as it has always been, to make every Indian proud. The men in blue shoulder the dreams of 1.4 billion Indians… pic.twitter.com/N5YyyrhXAI
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 9, 2024
42 वर्षीय गौतम गंभीरने 4 डिसेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. गंभीरने भारतासाठी शेवटची कसोटी 2016 मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. गंभीरने 58 कसोटी सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या ज्यात नऊ शतकांचा समावेश आहे.
गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. यामध्ये 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये खेळलेल्या 97 धावांच्या संस्मरणीय खेळीचाही समावेश आहे, ज्यामुळे भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. एकदिवसीय सामन्यात त्याने 11 शतकी खेळी खेळली. गंभीरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपली छाप सोडली. त्याने 37 सामन्यात सात अर्धशतकांच्या मदतीने 932 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी 27.41 होती.