गौतमचं विराटवर ‘गंभीर’ वक्तव्य, म्हणाला – ‘विराटला फिनिशर म्हणू नका…’

WhatsApp Group

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. विराटने पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध मॅचविनिंग इनिंग खेळली. या सामन्यात विराट कोहलीला आपले शतक पूर्ण करता आले नसले तरी त्याने 95 धावांच्या खेळीने लाखो चाहत्यांची मने जिंकली. आता विराट कोहली विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या सामन्यात स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीबद्दल असे काही बोलले आहे जे चाहत्यांना पचनी पडणार नाही.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना गौतम गंभीर म्हणाला, “तुम्ही विराट कोहलीला फिनिशर म्हणू शकत नाही, जो जिंकण्यासाठी शेवटची धाव घेतो तो फिनिशर असतो आणि फिनिशर 11 वा खेळाडू आणि सलामीवीर देखील असू शकतो. पण विराट कोहली एक मास्टर चेसर आहे तो सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत टिकून राहतो.

या सामन्यात विराट कोहलीचे शतक हुकले असेल पण त्याने 95 धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीसाठी शेवटपर्यंत टिकून राहणे खूप महत्त्वाचे होते आणि त्याने तेच केले. मात्र, संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणल्यानंतर विराट कोहली बाद झाला. त्याचे शतक 5 धावांनी कमी पडल्याने प्रेक्षकही निराश दिसले. या विश्वचषकात विराटच्या नावावर आता 3 अर्धशतके आणि एक शतक आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकले असते तर त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांची बरोबरी केली असती. मात्र यासाठी त्याला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

भारताने 4 गडी राखून विजय मिळवला

22 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाने 20 वर्षांनंतर आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. मोहम्मद शमीने गोलंदाजीत कमाल केली. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी शमीला संधी देण्यात आली होती. या सामन्यात शमीने 10 षटकात 54 धावा देत 5 बळी घेतले. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.