लुधियानाच्या गयासपुरामध्ये गॅस गळती, गुदमरून 9 जणांचा मृत्यू, संपूर्ण परिसर सील

WhatsApp Group

लुधियानाच्या गयासपुरा भागात गॅस गळतीमुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या घटनेत 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. गॅस गळतीची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर जखमींसाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गॅस गळतीचे स्त्रोत काय आणि कोणत्या गॅसची गळती झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. गॅस गळतीचे कारण आणि स्त्रोत याबाबत अद्याप तपास सुरू आहे.

लुधियानाच्या गयासपुरामध्ये गॅस गळतीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, लुधियानाच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले की, गॅस गळतीमुळे 11 लोक बेहोश झाले. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. गॅस गळतीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस कारखान्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. गॅस गळतीनंतर वैद्यकीय आणि पॅरामेडिक टीमसह NDRF टीम गयासपुराला पाठवण्यात आली आहे.

संपूर्ण परिसर सील करण्यात आला 
गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच आजूबाजूला अचानक चेंगराचेंगरी झाली. अग्निशमन दल आणि बचाव पथक गॅस गळती बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या कारखान्यातून गॅस गळती झाली तो कारखाना बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. गॅस गळतीमुळे कारखान्याच्या आजूबाजूला बांधलेल्या घरांमध्ये राहणारे अनेक जण बेशुद्ध पडू लागले. त्याचवेळी किराणा दुकानाच्या चालकाचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येथील आमदार राजिंदर कौर छिना यांनीही गयासपुरा गाठले. गॅस गळतीची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. सध्या हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.