महागाईचा भडका! गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 266 रुपयांनी वाढ!

WhatsApp Group

नवी दिल्ली – दिवाळीपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा मोठा धक्का दिला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी मोठी वाढ करण्यात आली आहे.

घरगुती वापरासाठी वापरल्या जाणार्‍या 14.2 किलो LPG सिलेंडरमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, ज्यामुळे दिलासा मिळाला आहे. 6 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या पुनरावलोकनानुसार दिल्लीत 19.2 किलोच्या सिलेंडरची किंमत केवळ 1736.50 रुपये होती. पण या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच आज 1 नोव्हेंबर 2021 रोजी त्यात 266 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे रेस्टॉरंटमधील पदार्थ खूप महाग होणार आहेत.

भाजीपाला, मोहरीच्या तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे रेस्टॉरंटमधील लोक आधीच नाराज झाले आहेत. आता दिवाळी सणाच्या तोंडावरच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या प्रचंड किमतीमुळे त्यांना खाण्यापिण्याच्या किमती वाढवाव्या लागतील. आणि यचा थेट परिणाम दरदोरचच्या व्यवयायावर होणार आहे.


विशेष म्हणजे एलपीजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत अद्याप वाढ न करून थोडा दिलासा दिला आहे. असं असलं तरी नंतर त्या वाढवल्या जाऊ शकतात.

यापूर्वी एलपीजीच्या किमतीत शेवटची वाढ 6 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. त्यानंतर 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवण्यात आली. जुलैपासून त्याची किंमत 90 रुपयांनी वाढली आहे. अनुदानावर सरकार एका कुटुंबाला वर्षभरात फक्त 12 सिलिंडर देते.