नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यापूर्वी एक दिलासा देणारी बातमी आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी केल्या आहेत Commercial LPG cylinder prices slashed.
मुंबईत आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमतीत 91.5 रुपयांची कपात करण्यात आल्याने आता एलपीजी सिलिंडर 1857 रुपयांना मिळणार आहे. या पूर्वी ही किंमत 1948.5 रुपये होती. दिल्लीत आता व्यवसायिक सिलिंडरचा दर 1907 रुपये तर कोलकात्यात सिलिंडरचा दर 1987असा असेल
हे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.