अग्नितांडव! छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

छत्रपती संभाजीनगर येथील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. आज पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान आगीची ही भीषण घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते.  यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – तैवानमध्ये गेल्या 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप, पाहा थरकाप उडवणारे व्हिडीओ

आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत इमारतीत राहणाऱ्या कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केला. लोकांनी फायर ब्रिगेडला फोन केला आणि पोलिसांनाही बोलावले. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग विझवली, मात्र तोपर्यंत लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच सर्व सामान जळून राख झाले.