
भारतीय रेल्वे ट्रेन्स म्हटलं तर उशीर आलाचं, क्वचितचं या ट्रेन वेळेत पोहोचत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक लांब पल्ल्याची ट्रेन वेळेत पोहोचली.या आनंदात प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर उतरत चक्क गरबा डान्सचं केला आहे. हे तर काहीच नाही या गरब्याला खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रोत्साहीत करणार ट्विट देखील केलं आहे. या गरब्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून, याची एकचं चर्चा रंगली आहे.
मजामा!
Happy Journey ???? pic.twitter.com/ehsBQs65HW— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 26, 2022
हरिद्वार सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२९१७) ही ट्रेन मध्य प्रदेशातील रतलाम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोहोचली होती. रतलामला पोहोचण्यासाठी ट्रेनचा नियोजित वेळ 10.35 होता. मात्र ही ट्रेन 20 मिनिटे आधीच रतलामला पोहोचली. त्यामुळे वेळेत पोहोचण्याच्या आनंदामध्ये असलेल्या प्रवाशांनी डब्यात बसण्याऐवजी प्लॅटफॉर्मवर उतरत चक्क गरबा डान्सचं केला. या गरबा नृत्याचा व्हिडिओ खुद्द रेल्वेमंत्र्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.