शिंदे सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रोत्सवात रात्री 12 वाजेपर्यंत खेळता येणार गरबा

WhatsApp Group

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे निर्बंधात साजरा होणार नवरात्रोत्सव यावर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. यंदा राज्यातील जनतेला नवरात्रोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा उत्सवाचे शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्यासाठी मुभा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीक्षेपक वापरास वाढीव दिवसाची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1, 3 आणि 4 ऑक्टोबरला सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरता येणार आहे.