Mumbai Woman Gang-Raped: मुंबईतील कुर्ला येथे महिलेवर सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

मुंबईतील कुर्ला परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी आणि पीडित महिला एकाच वस्तीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन पुरुष महिलेच्या घरात घुसले आणि नंतर तिला आपली शिकार बनवले. 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन आरोपींनी तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके दिले. आरोपींनी तिच्यावर गँगरेप केल्यानंतर तिचा प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके दिले. ही बाब कोणाला सांगितल्यास तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल, अशी धमकीही आरोपींनी महिलेला दिली.
या प्रकरणी कुर्ला पोलिसांकडून ही महिला कुर्ला परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी परिसरातील काही लोक महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. महिला एकटी असल्याचे पाहून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, गँगरेपनंतर आरोपीने तिच्यासोबत झालेल्या क्रूरतेचा व्हिडिओही बनवला आणि तिचे प्रायव्हेट पार्टवरही सिगारेटने चटके दिले. आरोपींनी तिच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप हिला यांनी केला आहे. यानंतर पीडितेला धमकी देण्यात आली की, तिने या घटनेबाबत कोणाला सांगितले तर तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल.
कुर्ला पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने तिचा त्रास शेजाऱ्यांना सांगितला, त्यानंतर एका एनजीओशी संपर्क साधण्यात आला आणि एफआयआर नोंदवण्यात आला. ते म्हणाले की, तिघांवरही भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 376, 376डी, 377, 324 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.