नवी दिल्ली: एका मोठ्या कारवाईत, केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने दिल्ली-एनसीआरमध्ये कार्यरत असलेल्या लहान मुलांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तपास यंत्रणेने 7 ते 8 मुलांची सुटकाही केली आहे. याप्रकरणी काही आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे. या टोळीचा दिल्ली आणि आसपासच्या भागांबरोबरच इतर राज्यांशी संपर्क आहे. सीबीआयने या संदर्भात इतर राज्यांमध्येही छापे टाकले आहेत. सध्या याप्रकरणी सातत्याने कारवाई सुरू आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने सुमारे 7-8 नवजात बालकांची सुटका केली आहे. तपास यंत्रणेशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात लवकरच 3 ते 4 आरोपींना अटक केली जाऊ शकते. सीबीआयने याबाबत औपचारिक खुलासा केला आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की सीबीआयला लहान मुलांसह 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची चोरी आणि तस्करी प्रकरणी अनेक सूचना मिळाल्या आहेत. अशा स्थितीत तपास यंत्रणेकडून सातत्याने शोधमोहीम सुरू आहे.
अनेक राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने बाल तस्करी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणा सीबीआयकडून दिल्ली एनसीआरसह इतर अनेक राज्यांमध्ये शोध मोहीम राबवली जात आहे. सूत्रानुसार, सीबीआयला काही काळापूर्वी मिळालेल्या बालकांच्या तस्करीशी संबंधित माहितीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आरोपींशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर आणि काही संस्थांवर छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रानुसार तपास यंत्रणेला झडतीदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. याबाबत लवकरच औपचारिक माहिती दिली जाईल.