गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, मूर्तीवरील उंचीची मर्यादा हटवली; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

WhatsApp Group

मुंबई : कोरोना व्हायरस महामारी काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी (Dahihandi 2022), गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) धुमधडाक्यात हे निश्चित झाले आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात गणपती मुर्तींवर लावण्यात आलेले उंचीचे निर्बंधही हटविण्यात आले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली आज एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी सण उत्सवाच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

कोरोना महामारीच्या काळात निर्बंधांमुळे मर्यादीत स्वरुपात साजरे करावे लागलेले उत्सव यंदा प्रथमच मोठ्या धुमधडाक्यात साजरे होतील. राज्य सरकारच्या या निर्णयाचा अनेक गणपती मंडळे आणि गोविंदा पथकांनीही जल्लोषात स्वागत केले आहे.