Gandhi Jayanti 2024 : महात्मा गांधींशी संबंधित ‘या’ 7 रंजक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

WhatsApp Group

Gandhi Jayanti 2024 : भारतात, 2 ऑक्टोबर हा ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी यांना समर्पित आहे. या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांना ‘बापू’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी देशाला अहिंसेचा मार्ग अवलंबण्याची शिकवण दिली. बापू आदर्शवादी, अहिंसक आणि सत्यवादी होते, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातच योगदान दिले नाही तर लोकांमधील जातीय भेदभावाविरुद्ध आवाज उठवला.

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांनी बॉम्बे विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले आणि नंतर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये गेले. 1891 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंग्लंडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 30 जानेवारी रोजी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली, त्यामुळे जगभरात शोककळा पसरली.

महात्मा गांधी यांच्या संबंधित मनोरंजक गोष्टी

1) बापूंचा जन्म महात्मा गांधी ही पदवी घेऊन झाला होता, काही लेखकांच्या मते ही पदवी त्यांना बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती.

2) महात्मा गांधींची 8 किलोमीटर लांबीची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

3) महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

4) पूर्वीच्या बिर्ला हाउसच्या बागेत गांधीजींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

5) प्रसिद्ध लेखक लिओ टॉल्स्टॉय आणि गांधीजी पत्रांद्वारे एकमेकांशी बोलत असत.

6) गांधीजींना एकदाही नोबेल पारितोषिक मिळालेले नाही, पण 1937, 1938, 1939, 1947 मध्ये या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

7) तामिळनाडूच्या मदुराई शहरात 1959 मध्ये गांधी स्मारक संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. या संग्रहालयात रक्ताने माखलेले कापड आहे जे महात्मा गांधींनी नथुराम गोडसेनं केलेल्या हत्येच्या वेळी परिधान केले होते.