
FYJC Admission : दहावीचा निकाल (SSC Result) अद्याप जाहीर झाला नाही. पण येत्या काही दिवसांमध्येच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी (Education Minister) आहे. अशामध्ये आता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज (Online application for 11th admission) भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या आणि निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फक्त अकरावी प्रवेशासाठीचा पहिला भाग ऑनलाइन पद्धतीनं भरायचा आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे.
मुंबई महानगर (Mumbai), पुणे (Pune) , पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchvad), नाशिक (Nashik), अमरावती (Amravati), नागपूर (Nagpur) या विभागांमध्ये अकरावी (11th Admission) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे. तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायची आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.
असा भरा अर्जाचा भाग 1 –
- सर्वात आधी विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- याठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे.
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.
- ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करायचा.
- त्यानंतर अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे.
- मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.