Video : यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

WhatsApp Group

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्याच्या माळकिन्ही गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह घेऊन नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून प्रेतावर अंत्यसंस्कार केले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नातेवाईकांनी मृतदेह तिरडीवर बांधून खांद्यावर घेऊन एकमेकांच्या साह्याने नाल्याच्या पुरातून वाट काढत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना महागाव तालुक्यामधील माळ किन्ही या गावातील आहे.