
फिफा विश्वचषक स्पर्धेची क्रेझ जगभरात आहे. दरम्यान, रोनाल्डोपासून मेस्सीपर्यंतच्या गर्लफ्रेंड आणि पत्नींबाबत बरीच चर्चा आहे. जगातील दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज खूप चर्चेत आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड रॉड्रिग्ज यांना 4 मुले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
रोनाल्डो आणि जॉर्जिना 2017 पासून एकमेकांसोबत आहेत. दोघांची बाँडिंग चाहत्यांना खूप आवडते. जरी दोघांनी अद्याप लग्न केले नाही. लग्नाबाबत रोनाल्डोने वेळ आल्यावर लग्न करणार असल्याचे आधीच सांगितले आहे.
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुजो हिचीही खूप चर्चा आहे. ती खूप ग्लॅमरस आयुष्य जगते. अँटोनेला आणि मेस्सी यांना तीन मुले आहेत. हे कपल सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांचे फोटो पोस्ट करत असते. मेस्सीची पत्नी अँटोनेला खूपच ग्लॅमरस आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती मोठमोठ्या मॉडेल्सना मागे सोडते. अँटनेला अनेकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
View this post on Instagram
बेल्जियमचा स्टार फुटबॉलपटू ऍक्सेल विट्सेल आणि त्याची पत्नी राफेला स्झाबो देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. राफेला आणि एक्सलने 2015 मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी एक्सलने राफेलाला 6 वर्षे डेट केले होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
ऍक्सलची पत्नी राफेला ऍक्सेल तिच्या मुलासोबत आणि पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. राफेला खूपच ग्लॅमरस आहे. एक्सल आणि राफेला या जोडीला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते.