२३ वर्षांनी पुन्हा दुमदुमली शाळा…

WhatsApp Group

जुन्नर | शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या २००२ च्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच जुन्नर येथे उत्साहात पार पडला. तब्बल १०० माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागांतून खास या सोहळ्यासाठी जमले होते.

कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक श्री. ढोले, श्री. दाते, श्री. ढमाले, श्री. उकिरडे, सौ. कचरे आणि सौ. थोरवे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.

सौ. कचरे यांनी “यशाइतकेच शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे” असल्याचे अधोरेखित करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर श्री. ढमाले यांनी शाळेतील गमतीदार आठवणी सांगून वातावरण रंगवले.

यावेळी माजी विद्यार्थी गौरी बोऱ्हाडे, मेघा गोसावी, प्रिती कर्पे-केदारी, पीयूष उनकूले, शशिकांत भगत आणि अमर केदारी यांनी मनोगत व्यक्त केले.

दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वागत करताना संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल जोशी यांनी “विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळेच शाळेचे नाव देशभर झळकत आहे” असे समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य गुंड व डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी केले.