खूशखबर! ‘या’ नागरिकांसाठी एसटीचा प्रवास आता मोफत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

WhatsApp Group

मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसमधून मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी हा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे अतिथीगृह सह्याद्री येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. 75 वर्षे वयोगटातील नागरिकांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विमा संरक्षणाचा हप्ता सरकार भरणार आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.