फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र; लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्व माहिती येथे जाणून घ्या

0
WhatsApp Group

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरीबसुन स्वतःचा उद्योग सुरु करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. जेणेकरून महिला शिलाई मशीन वर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमावू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या रोजगाराची एखादी संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला शिलाई मशीन च्या सहाय्याने घरी बसून परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे मिळवू शकतील त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू 5 हजार पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा राज्य शासनाचा हेतू आहे.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील पुष्कळ कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे महिलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण भागात रोजगाराच्या स्थायी संधी उपलब्ध नसल्या कारणामुळे महिलांना रोजगार मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे महिलांना आपल्या कुटुंबातील गरज पूर्ण करणे शक्य होत नाही.

महिला घरामधून केला जाणारा एखादा लघु उद्योग करण्यासाठी इच्छुक असतात त्यासाठी शिवणकाम हा एक योग्य पर्याय महिलांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे राज्यातील महिला शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिवणकाम योजनेअंतर्गत शिवणकामाचा लाभ मिळवतात परंतु त्यांना शिलाई मशीन ची किंमत जास्त असल्याकारणामुळे खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी इतरांकडून जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील गरजू महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा जेणेकरून ते स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

आम्ही शिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

शिलाई मशीन योजना महाराष्ट्रचे उद्दिष्ट

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने सदर योजना सुरु करण्यात आली आहे व या योजनेअंतर्गत गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
 • राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
 • राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
 • गरीब कुटुंबातील महिलांचे मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत जीवनमान सुधारणे
 • महिलांचे जीवनस्तर सुधारणे
 • महिलांना स्वावलंबी बनविणे
 • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहाय्य करणे
 • महिलांना कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये
 • महिलांना शिलाई मशीन च्या खरेदीसाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्नात थोड्याफार प्रमाणात वाढ करणे
 • महिलांचे भविष्य उज्वल बनविणे
 • महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी करणे
 • बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे
 • राज्याचा आर्थिक विकास करणे
 • महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

Free Sewing Machine Scheme Maharashtra चे वैशिष्ट्य

 • केंद्र शासनाद्वारे मोफत शिलाई मशीन योजना सुरुवात करण्यात आली आहे
 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने मोफत शिलाई मशीन योजना महत्वाची योजना ठरणार आहे.
 • राज्यातील 50 हजारांपेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाईल.
 • मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
 • मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून महिलांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 • महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी सदर योजना एक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
 • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हि योजना उपयुक्त ठरणार आहे.
 • राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास तसेच राज्यात महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

आवश्यक पात्रता

 • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

अटी व शर्ती

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच योजनेचा चा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे
 • अर्जदार महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • वय वर्षे 40 वरील वरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांनाच देण्यात येईल.
 • राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
 • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त नसावे.
 • अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
 • केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत अर्जदार महिलेने लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • सरकारी नोकरीत कार्यरत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेला अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाण पत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मोफत शिलाई मशीन चा लाभ दिला जाईल
 • अर्जदार महिलेने खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेमधून रद्द केले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी पुरावा
 • विजेचे बिल
 • मोबाईल क्रमांक
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक खात्याचा तपशील
 • महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 • महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
 • कुटुंबाचा उत्पन्न दाखला

अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदार महिला जर ग्रामीण भागातील रहिवाशी असेल तर आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जावे लागेल तसेच महिला शहरी भागातील रहिवाशी असल्यास आपली जवळच्या महानगर पालिका कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.