Free Corona Booster Dose : आजपासून सर्वांना मिळणार मोफत बूस्टर डोस; कधी, कुठे, कसा मिळणार? जाणून घ्या सर्व

WhatsApp Group

भारत देशाचा सध्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमांचा सोहळा सुरू आहे. यामध्येच आता कोविड 19 (COVID 19) चं संकट पाहता ‘कोविड लस अमृत महोत्सव’ ची देखील घोषणा झाली आहे. याच्या माध्यमातून नागरिकांना कोविड 19 चा बुस्टर डोस देण्याचा मानस आहे. आज 15 जुलै पासून पुढील 75 दिवस मोफत बुस्टर डोस (Booster Dose) दिला जाणार आहे. महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस दिला जाईल.

कोरोनाचं संकट अद्यापही शांत होतं नाहीय. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा या हेतूमधून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ जाहीर करण्यात आला आहे.18 वर्ष आणि पुढील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. बुस्टर डोस पूर्वी दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना हा बुस्टर डोस दिला जाणार आहे.

दरम्यान सरकारी हॉस्पिटल मध्येच केवळ नागरिकांना मोफत बुस्टर डोसची सोय करण्यात आली आहे. तुम्ही खाजगी केंद्रांवर किंवा खाजगी रूग्णालयामध्ये बुस्टर डोस घेणार असाल तर त्यासाठी कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोससाठी 225 रुपये शुल्क आकरण्यात येतील.

कोविड 19 चा दुसरा डोस घेऊन 6 महिने झालेले सर्व नागरिक आता बुस्टर डोस घेऊ शकतात. यापूर्वी हा काळ 9 महिने होता पण आता तो कमी करण्यात आला आहे. ज्या लसीच्या पूर्वी दोन डोस घेतले आहेत त्याच लसीचा तिसरा अर्थात बुस्टर डोस दिला जाईल.