टेनिस स्टार मारिया शारापोव्हाविरुद्ध गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

WhatsApp Group

दिल्ली – रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हा Maria Sharapova सध्या कोर्टपासून दूर असली तरी ती आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रशियाची माजी खेळाडू मारिया, फॉर्म्युला वन रेसर मायकेल शूमाकर Michael Schumacher आणि अन्य ११ जणांविरोधात फसवणूक व गुन्हेगारी कटाखाली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे Fraud Case Against Maria Sharapova. दिल्लीच्या एका महिलेने या सर्वांवर फसवणूकीची तक्रार दाखल केल्यानंतर आता FIR नोंदवण्यात आले आहे.

शेफाली अग्रवाल असं या महिलेचे नाव आहे आणि नवी दिल्ली येथील चत्तारपूर मिनी फार्म येथे ती राहते. शारापोव्हाच्या नावाच्या प्रोजेक्टमध्ये तिनं अपार्टमेंट बूक केलं होतं आणि शूमाकर याच्या नावाच्या टॉवरमध्येही तिने अपार्टमेंट बूक केलं होतं. २०१६ मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अजूनही तो तसाच आहे. त्यामुळे महिलेने ही तक्रार दाखल केली आहे.


आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी या फसवणूकीमध्ये संबंधित संस्थेला सहाय्य केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तिने गुरुग्राम कोर्टात M/S Realtech Development and Infrastructure (INDIA) Pvt. Ltd सह शारोपाव्हा व शूमाकर यांच्यावर ८० लाखांच्या फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी असं म्हटलं की गुरुग्राम येथील सेक्टर ७३ मधील शारापोव्हाच्या नावाच्या प्रोजेक्टमध्ये तिनं व तिच्या पतीने अपार्टमेंट बूक केलं, परंतु व्यावसायिकाने त्यांची फसवणूक केली.

आम्हाला जाहिरातींद्वारे प्रकल्पाची माहिती मिळाली. प्रकल्पाची छायाचित्रे व आकर्षक ऑफर पाहिल्यानंतर आम्ही कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता. पण, ही सर्व आश्वासने खोटी होती, असंही तिने तक्रारीत म्हटलं आहे. शारापोव्हा व शूमाकर यांनी हे या प्रकल्पाचे प्रमोटर होते. माजी टेनिस स्टार शारापोव्हाने प्रकल्प स्थळी भेट दिली होती आणि टेनिस अकादमी आणि स्पोर्ट्स स्टोअर उघडण्याचं आश्वासनही दिले होते, असाही आरोप त्या महिलेने केला आहे.