जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir)मध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा (4 terrorist killed in encounter) करण्यात आला आहे. चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोन लष्कर ए तैयबाचे तर दोन दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे असल्याची माहिती समोर आली आहे.
पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे तर हंदवाडा येथे एका दहशतवाद्याचा आणि गांदरबल येथे एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले आहे. काश्मीर पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
We had launched joint ops at 4-5 locations yesterday night. So far 2 terrorists of JeM including 1 Pakistani killed in Pulwama, 1 terrorist of LeT killed each in Ganderbal & Handwara. Encounters over in Handwara & Pulwama. Also arrested 1 terrorist alive: IGP Kashmir
(File pic) pic.twitter.com/BPN25Gx3dz
— ANI (@ANI) March 12, 2022
काश्मीरचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितलं की, पुलवामा येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. अद्यापही या परिसरामध्ये दोन दहशतवादी आहेत आणि भारतीय सैन्याची या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. पुलवामाच्या चेवाकलां परिसरात शुक्रवारी सायंकाळी सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.