BREAKING: मुंबईतील कुर्ला परिसरात दुर्घटना; चार मजली इमारत कोसळली,20-25 जण ढिगाऱ्याखाली

WhatsApp Group

मुंबई – मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत (Mumbai Building Collapse) कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचीही तुकडी तातडीनं दाखल झाली.

एनडीआरएफच्या जवनांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यामध्ये जवनांनी सात जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अद्याप मृत्यूचा कोणताही आकडा समोर आलेला नाही. तरी ढिगाऱ्याखाली आणखी २० ते २५ जण अडकले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.