Oklahoma Hospital Firing: अमेरिका पुन्हा हादरली! ओल्काहोमामधील रुग्णालयात बेछुट गोळीबार, ४ जणांचा मृत्यू

WhatsApp Group

Oklahoma Hospital Firing: मेरिकेत (America) गोळीबाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. 8 दिवसांपूर्वी अमेरिकेच्या टेक्सास शहरामध्ये गोळीबाराची (Shooting) घटना समोर आली होती. यामध्ये 19 विद्यार्थ्यांसह तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारची घटना बुधवारी घडली आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमा (Oklahoma) शहरात एकाने गोळीबार सुरू केला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

सीएनएनच्या वृत्तानुसार, तुलसा पोलिसांना बुधवारी सकाळी सेंट फ्रान्सिस रुग्णालय परिसरातील वैद्यकीय इमारतीत एक व्यक्ती शस्त्र घेऊन पोहोचला असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत हल्लेखोराने गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडली.

हल्लेखोराकडे एक रायफल आणि हँडगन होती. या गोळीबारामागील कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस सध्या हल्लेखोराची ओळख पटवत आहेत. हल्लेखोर ३५ ते ४० वयोगटातील असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या