धक्कादायक! मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण

WhatsApp Group

दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सांगली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांना चारही साधूंना बेदम मारहाण केली.