हत्याकांडानं अहमदाबाद हादरलं, एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या

WhatsApp Group

गुजरातची (Gujrat ) राजधानी अहमदाबाद (Ahmedabad Murder) एका हत्याकांडांने हादरुन गेली आहे. विशेष म्हणजे चार दिवसानंतर हे हत्याकांड समोर आलं. एकाच कुटुंबामधील चार जणांची हत्या करण्यात आली आहे आणि चारही जणांचे मृतदेह हे वेगवेगळ्या रुममध्ये सापडलेत आहेत.

घरात झालेल्या वादातूनच हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक संशय पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याच आधारावर विनोद मराठी नावाच्या एका संशयीत आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. हत्याकांडाचं नेमकं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही. संशयीत आरोपी पोलीसांच्या हाताला लागला तर आणखी काही खुलासे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीसांनी शोधाशोध घेतल्यानंतर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे एक ‘मराठी’ कुटुंब आहे. म्हणजेच कुटूंब मराठी आहे की त्यांचे आडनाव मराठी आहे याची अजून सविस्तर माहिती समोर आली नाही. पण कुटुंबातल्या वादातूनच विनोद मराठी ह्या संशयीत आरोपीनंच स्वत:च्या कुटुंबाचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती आहे.

विनोद मराठीनेच पत्नी सोनल मराठी, मुलगी प्रगती, मुलगा गणेश आणि सासू सुभद्राबाई यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतं आहे. पण सध्या तरी विनोद मराठी हा फरार आहे. हे हत्याकांड चार दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.