क्रिकेटविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू मुशर्रफ हुसैन रुबेल याचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.
The Bangladesh Cricket Board (BCB) mourns the passing of former Bangladesh National Team player Musharraf Hossain Rubel.The left-arm spinner amassed over 550 wickets across all formats in a career spanning two decades. The BCB extends profound sympathies and condolences.#BCB pic.twitter.com/mKJaslFU9q
— Bangladesh Cricket (@BCBtigers) April 19, 2022
मागील बऱ्याच दिवसांपासून मुशर्रफ कॅन्सरशी झुंज देत होता, अखेर मंगळवारी (१९ एप्रिल) यूनायटेड रुग्णालयामध्ये त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या कुटुंबियांनी याबद्दल माहिती दिली आहे.