मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंग यांना गेल्या काही दिवसांपासून समन्स बजावण्यात आला होता मात्र त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर आलं नाही. अखेर परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.
परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या परमबीर सिंग हे गायब आहेत. ते कोर्टातदेखील हजर राहिले नव्हते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. #parambirsingh https://t.co/3iyTTaeV1s
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) November 17, 2021
परमबीर सिंग यांना गेल्या काही दिवसांमध्ये समन्स बजावण्यात आले होते. मात्र यावर त्यांच्याकडून काहीच प्रत्युत्तर न आल्यामुळे त्यांच्याविरोधात आता वॉरन्ट जारी करण्यात आले आहे.