मोठी बातमी! सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ‘या’ शिवसेना नेत्याला अटक

WhatsApp Group

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे नसल्याचं समजतं. त्यामुळे थोड्याच वेळात महाडेश्वर यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले होते.
त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरीट सोमय्या पोलीस ठाण्यामधून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि किरीट सोमय्यांना जखम झाली. या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली आहे.