माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे निधन; वयाच्या व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्यावर नांदेड (Nanded Politics) येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भोकरदनमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या जाण्याने (Bapusaheb Gorthekar Pass Away) संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. उमरी तालुक्यातील गोरठा या मूळ गावी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज (25 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार पद भुषवले होते. शब्द पाळणारा, प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख होती. विरोधक असलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत भोकर मतदार संघामधून अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.